Ganesh Chaturthi 2023 | जे.पी.नड्डा ‘वर्षा’वर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पाचं घेतलं दर्शन

| Updated on: Sep 26, 2023 | 6:40 PM

VIDEO | भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी उपस्थित राहून एकनाथ शिंदे यांच्या बाप्पांचे मनोभाव दर्शन घेतले. जे. पी. नड्डा यांचे एकनाथ शिंदे यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि गणरायाची मूर्ती देऊन स्वागत

मुंबई, २६ सप्टेंबर २०२३ | राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह कायम असून घरोघरी बाप्पाचे आगमन झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. राज्यभरात बाप्पाला निरोप देण्यासाठी दोन दिवस उरल्याने भाविकांच्या मनात हूरहूर निर्माण झाली आहे. तर दूसरीकडे राजकीय नेते मंडळीदेखील राजकीय वर्तुळातील नेते मंडळींच्या निवासस्थानी दाखल होत बाप्पाचं दर्शन घेताना दिसताय. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल होत त्यांच्या बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच श्री गणरायाची मनमोहक मूर्ती देऊन त्यांना सन्मानितदेखील केल्याचे पाहायला मिळाले. जे. पी. नड्डा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आदी नेते उपस्थित होते.

Published on: Sep 26, 2023 06:40 PM
Ganesh Chaturthi 2023 | बाप्पासाठी पुण्यातच साकारलं अयोध्येतील राम मंदिर! बघा हुबेहूब प्रतिकृती
‘2 महिन्यात दुकानांवर मराठी नावांच्या पाट्या लावा’, सुप्रीम कोर्टाचे नेमके आदेश काय?