Ganesh Chaturthi 2023 | ठाण्यातच घ्या अष्टविनायक गणपती बाप्पाचं दर्शन, कसं? बघा व्हिडीओ
VIDEO | ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक उत्सव मंडळ, शिवसेना शाखा जय भवानी नगर गणेशोत्सव मंडळाने बाप्पासाठी साकारला अष्टविनायक गणपतीचा देखावा, बघा व्हिडीओ आणि तुम्ही जर अष्टविनायकाला गेला नसाल तर घरबसल्या घ्या अष्टविनायक बाप्पाचं दर्शन
ठाणे, २६ सप्टेंबर २०२३ | ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा जय भवानी नगर यांच्यावतीने अष्टविनायक देखावा सादर करण्यात आला आहे. गणेश भक्तांना अष्टविनायक दर्शनासाठी अडीच दिवस लागतात, मात्र या मंडळात अष्टविनायक गणपतीचे दर्शन एकाच दिवशी घेता येणार आहे. यासाठी ठाण्यात पर्यावरणभिमुख अशा प्रकारचा देखावा साकारण्यात आलेला आहे. मागच्या वर्षी याच मंडळाने शिवसेना कोणाची असा देखावा सादर केला होता. विशेष म्हणजे पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना मिळाले आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून ते विराजमान झाले. शिवसेना म्हणजे कष्टकऱ्यांची तसेच बाळासाहेबांनी सांगितले होते की 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या हेतूनेच पुढे शिवसेना चिन्ह आणि पक्ष हे एकनाथ शिंदेना मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने पुढे एकनाथ शिंदे सर्वांना घेऊन जात आहे, असे देखील मंडळाचे संस्थापक आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी सांगितले आहे.