Ganesh Chaturthi 2023 | बाप्पासाठी कायपण ! चक्क २०० किलो टॉमेटोनं केली बाप्पाकरता सजावट

| Updated on: Sep 25, 2023 | 3:48 PM

VIDEO | कल्याणमधील एका भाजी विक्रेत्यानं लढवली शक्कल... शेतकरी अरुण हारक यांनी चक्क आपल्याच शेतातील २०० किलो टॉमेटोचा वापरून साकारली आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी सजावट, बघा सुंदर अशी सजावट

ठाणे, २३ सप्टेंबर २०२३ | राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाने राज्यात सर्वत्र ठिकाणी आनंदाचं आणि मंगलमय वातावरण आहे. घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपती बाप्पा मोठ्या थाटा-माटात विराजमान झाले आहेत. अशातच अनेक सार्वजनिक मंडळात आणि घरोघरी इको फ्रेंडली सजावट करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात एका शेतकऱ्याने आपल्या बाप्पासाठी अनोखी शक्कल लढवल्याचे पाहायला मिळत आहे. कल्याणमधील भाजी विक्रेते आणि शेतकरी अरुण हारक यांनी आपल्या शेतातील टॉमेटोचा वापर करून आकर्षक सजावट केली आहे. शेतकरी अरूण हारक यांनी 200 किलो टॉमेटो वापरून आपल्या लाडक्या बाप्पांसाठी आकर्षक अशी सजावट केली आहे. दरवर्षी गणेशोत्सवात व्यापारी फळं, फुलापासून देखावे साकारतात यामुळे हारक यांनी आपल्या शेतातील टोमॅटो वापरून बाप्पाची आरास केली आहे. 200 किलो टोमॅटोपासून त्यांनी हा सुबक देखावा साकारला आहे.

Published on: Sep 23, 2023 10:51 AM