Ganesh Chaturthi 2023 | लालबागच्या राजाच्या चरणी पहिल्या दिवशी 25 लाखांहून अधिक भक्त नतमस्तक, किती आलं दान?

| Updated on: Sep 25, 2023 | 3:49 PM

VIDEO | मुंबईतील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा अशी ओळख असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता भक्तांचा महापूर, पहिल्याच दिवशी 25 लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन तर सोनं-चांदीसह आलं भरभरून दान

मुंबई, २० सप्टेंबर २०२३ | मुंबईसह देशातील लाखो अन् कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राज्याच्या दर्शनाला गणेशोत्सवातील दहाही दिवस भाविक मुंबईत दाखल होत असतात. लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता पहिल्याच दिवशी 25 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याचे समोर आले आहे. पहिल्याच दिवशी लालबागच्या चरणी भरभरून दान आल्याचे पाहायला मिळत आहे. आज मंडळाकडून राजाच्या चरणी भक्तांकडून अर्पण करण्यात आलेल्या दानाची मोजदाज होत आहे. ही मोजणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि बँक ऑफ महाराष्ट्र आणि जी एस महानगर बँकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. लालबागच्या राजाच्या चरणी यंदा मोठ्या प्रमाणात रक्कम दान करण्यात आली आहे. त्याचसोबत परकीय चलन सुद्धा बाप्पाच्या चरणी भाविकांनी अर्पण केल्याचे सांगितले जात आहे.

लालबागच्या राजाच्या चरणी यंदा भक्तांकडून मोठ्या प्रमाणात दान अर्पण करण्यात आली आहे. बाप्पाच्या चरणी सोन्या-चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणात अर्पण करण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लालबागच्या बाप्पाच्या चरणी मोठ्या प्रमाणात देणगी येणार असा विश्वास मंडळाकडून व्यक्त केला जात आहे.

Published on: Sep 20, 2023 02:14 PM