Mumbaicha Raja 2023 | शिवराज्याभिषेकानिमित्त मुंबईचा राजा येथे थेट किल्ले रायगडाची प्रतिकृती
VIDEO | मुंबईचा राजाच्या परिसरात यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेकानिमित्त रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. बघा भव्य किल्ले रायगडची आकर्षक सजावट
मुंबई, १९ सप्टेंबर २०२३ | मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाला उत्साहात सुरूवात झाली आहे. मुंबईचा गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे बाप्पाच्या मोठ मोठ्या मुर्त्या आणि त्यासाठी सार्वजनिक मंडळाने केलेले डेकोरेशन. दरम्यान गणेशोत्सवाचे दहाही दिवस मुंबई अक्षरशः आनंदाने आणि भाविकांच्या गर्दीने गजबजलेली दिसते. अशातच मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला गणेश गल्लीच्या राजाचं आगमन आज झाले असून विधिवत पूजा पार पडली. यानंतर सकाळपासून मुंबईच्या राजाच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या राजाच्या परिसरात यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेकानिमित्त रायगड किल्ल्याचा देखावा साकारण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या राजाच्या मंडपासह आसपासच्या भागात शिवराज्याभिषेकानिमित्त किल्ले रायगडाची प्रतिकृती भाविकांसह मुंबईकर नागरिकांना आजपासून पुढील दहा दिवस बघता येणार आहे.