Ganesh Chaturthi 2023 | अवलिया कलाकारानं मोदकावरच रेखाटलं लाडक्या गणरायाचं चित्र, बघा VIDEO

| Updated on: Sep 19, 2023 | 5:31 PM

VIDEO | मालेगावच्या कलाकाराने साकारले मोदकावर बाप्पांचे चित्र. अवलिया कलाकार संदीप आव्हाड यांनी श्री गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या आगमनासाठी बाप्पांच्या आवडत्या मोदकावर बाप्पाचे सुंदर चित्र रेखाटले

नाशिक, १९ सप्टेंबर २०२३ | राज्यभरात गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या तयारीसाठी राज्यातील संपूर्ण बाजारपेठा, मिठाईची दुकानं पूर्णतः गजबलेल्या बघायला मिळत आहे. घरोघरी बाप्पाचं आगमन झालं तरी भक्तांची तयारी अजून काही संपताना दिसत नाही. मग ते बाप्पाची आराससाठी लागणारं काही सामान असो किंवा मग बाप्पाला आवडणाऱ्या गोड मोदकांचा नैवेद्य असो… बाप्पाला किती काय करू आणि किती नाही…अशेच काहिसे भाव प्रत्येकाच्या मनात असतात. बाजारात बाप्पासाठी विविध प्रकारच्या मिठाई किंवा वैविध्यपूर्ण मोदक देखील आजकाल बाजारात उपलब्ध झाले आहेत. मात्र हे फक्त नैवेद्य किंवा प्रसाद म्हणून आपल्याला माहित असेल… पण नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या एका अवलिया कलाकाराने चक्क मोदकावरच लाडक्या बाप्पाचं चित्र रेखाटल्याचे पाहायला मिळाले. या कलाकाराचे नाव संदीप आव्हाड असे आहे. त्यांनी श्री गणेश चतुर्थी निमित्त बाप्पाच्या आगमनासाठी बाप्पांच्या आवडत्या मोदकावर बाप्पांचे चित्र रेखाटले आहे. बघा व्हिडीओ

Published on: Sep 19, 2023 05:22 PM