Ganesh Chaturthi 2023 | ३० फूट रुंद, ३० फूट लांब अन् ३० फूट उंच काशी विश्वनाथ मंदिराची बघा भव्य प्रतिकृती

| Updated on: Sep 25, 2023 | 3:42 PM

VIDEO | मालेगाव शहरातील पाटीलवाडी सोयगाव येथील स्वराज मित्र मंडळ गणेशोत्सव मित्र मंडळाकडून हुबेहूब काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती, तब्बल ३० फूट रुंद, ३० फूट लांब आणि ३० फूट उंच असा हा आकर्षक देखावा

नाशिक, २५ सप्टेंबर २०२३ | मालेगाव शहरात विविध गणेश मंडळाकडून परंपरेनुसार लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आलीय. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक मंडळाकडून आकर्षक देखावे देखील साकारण्यात आलेय. अशातच एक सुंदर असा देखावा मालेगावकरांचे लक्ष वेधून घेत आहे. मालेगाव शहरातील पाटीलवाडी सोयगाव येथील स्वराज मित्र मंडळ गणेशोत्सव मित्र मंडळाकडून हुबेहूब काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलीय. ज्या भाविकांना काशी विश्वनाथ येथे जाऊन दर्शन घेणे शक्य नाही, त्यांना काशी विश्वनाथाचे दर्शन घेणे सुलभ व्हावे, या हेतूने मंडळाकडून हा देखावा तयार करण्यात आलाय. तब्बल ३० फूट रुंद, ३० फूट लांब आणि ३० फूट उंच असा हा आकर्षक देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मंदिराच्या प्रतिकृतीवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलीय. हा देखावा बघण्यासाठी मालेगावकर भाविकांनी गर्दी केली.

Published on: Sep 25, 2023 10:31 AM
Salman-ShahRukh Khan | भाईजान अन् किंगखान ‘वर्षावर’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पाचं घेतलं दर्शन
‘… तर २०२४ ला फडणवीस यांचं सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही’, कुणी दिला इशारा?