Ganesh Chaturthi 2023 : पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीला यंदा राम मंदिराचा देखावा, बघा कशी सुरूये तयारी?
VIDEO | पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला यंदा अयोध्येतील प्रभू राम मंदिराचा भव्य देखावा, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू रामाची वानरसेना बघायला मिळणार आहे. बघा व्हिडीओ
पुणे, १७ सप्टेंबर २०२३ | आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास उरले आहेत. राज्यात गणेशोत्सवाची लगबग भाविकांकडून सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला यंदा अयोध्येतील प्रभू राम मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात येत आहे. दरवर्षी हलवाई गणपतीला अनोखा भव्य देखावा साकारण्यात येत असतो. यंदा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू रामाची वानरसेना उभी केल्याचे पाहायला मिळत आहे. त्या वानरसेनेने आपल्या डोक्यावर दगड घेतले असून त्यावर श्रीराम असे लिहिलेले दिसत आहे. याच ठिकाणी परवा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ चालक मोहन भागवत यांच्या हस्ते या बाप्पाची पहिली आरती होणार आहे. तर या मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे. त्या मार्गावर प्रभू श्री रामाच्या रामायणाची प्रतिकृती लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.