Ganesh Chaturthi 2023 : पुणे स्वारगेट बस स्थानकावर प्रवाशांची तुडूंब गर्दी, एस.टी महामंडळाकडून कसं आहे नियोजन?

| Updated on: Sep 19, 2023 | 2:22 PM

VIDEO | पुण्यातून गावी जाण्यासाठी नागरिकांची स्वारगेट बस स्थानकांवर सकाळी 6 वाजेपासून मोठी गर्दी, गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ देखील सज्ज, एसटी महामंडळाकडून आज आणि उद्या 190 जादा बसेस सोडण्यात येणार

पुणे, १७ सप्टेंबर २०२३ | गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे दोन दिवस बाकी असल्याने राज्यभरात गणेशभक्तांची गणेशोत्सवासाठी मोठी लगबग बघायला मिळत आहे. तर कोकणत जाण्यासाठी चाकरमान्यांनी कोकणाची वाट धरली आहे. दिवा स्थानक, लोकमान्य टिळक टर्मिनसवर गावाला जाण्यासाठी चाकरमान्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. याप्रमाणेच पुण्यातून गावी जाण्यासाठी नागरिकांची बस स्थानकांवर मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे स्वारगेट बस स्थानकावरुन सकाळी 6 वाजेपासूनच गणेशोत्सवासाठी पुण्याहून कोकण आणि मराठवाड्यात जाणाऱ्यांची मोठी गर्दी होती. दरम्यान, गणेशोत्सवासाठी एस टी महामंडळ देखील सज्ज असल्याचे पाहायला मिळत असून एस टी महामंडळाकडून आज आणि उद्या 190 जादा बसेस सोडण्यात येणार आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकासह वाकडेवाडी बस स्थानकांतही प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती.

 

Published on: Sep 17, 2023 09:48 AM
Thane Weather | ठाणे शहरासह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळणार? हवामान खात्यानं कोणता दिला अलर्ट?
Konkan Railway | सलग दुसऱ्या दिवशी कोकण रेल्वे कोलमडली, काय कारण अन् किती तास उशिराने धावतेय ट्रेन?