Ganesh Chaturthi 2023 | ‘लालबागच्या राजा’च्या दर्शनासाठी आलेल्या तरूणीला मंडपातच भोवळ अन्…

| Updated on: Sep 25, 2023 | 3:47 PM

VIDEO | मुंबईसह देशातील कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राज्याच्या दर्शनाला भाविकांचा महापूर, राज्याच्या दर्शनासाठी आलेल्या एका तरूणीला भोवळ, सभांडपात एकच धावाधाव

मुंबई, २३ सप्टेंबर २०२३ | मुंबईसह देशातील लाखो अन् कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राज्याच्या दर्शनाला गणेशोत्सवातील दहाही दिवस भक्त-भाविक मुंबईत दाखल होत असतात. तर लालबागच्या राज्याच्या दर्शनाला नेहमी लाखोंच्या गर्दीने भाविक उपस्थित असतात. एकीकडे मुंबईत पावसाची रिमझिम सुरू असताना देखील लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी भाविक भल्या मोठ्या रांगेत उभे राहून बाप्पाचं रूप पाहण्यासाठी उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाचा पाचवा दिवस असल्याने आजही राजाच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी कायम आहे. तर राज्याच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी असल्याने भाविकांना तासन् तास राज्याच्या दर्शनासाठी प्रतिक्षेत आहे. गर्दीमुळे भक्तांची लालबागच्या सभामंडपात मोठी गैरसोयदेखील होत आहे. अशातच सकाळी दर्शनासाठी आलेल्या एका तरूणीला अचानक भोवळ आली. यावेळी सोबतच्या काही महिला पुरूष भाविकांनी तिला सावरलं आणि त्वरीत तिच्यावर उपचार करण्यात आले, सध्या या तरूणीची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळतेय.

Published on: Sep 23, 2023 12:34 PM
Maharashtra Rain Update | येत्या ४८ तासात मॉन्सून होणार सक्रिय, राज्यात कुठं कोसळणार मुसळधार पाऊस?
Vijay Wadettiwar यांची शिवसेनेतील अपात्र आमदारांसंदर्भात मोठी मागणी, बघा काय म्हणाले?