Ganesh Chaturthi 2023 | खड्डयांसाठी गणपती बाप्पा कुठं उतरले रस्त्यावर ? चक्क बाप्पानेच पालिका आयुक्तांना दिलं निवेदन

| Updated on: Sep 19, 2023 | 10:09 AM

VIDEO | उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे, या खड्ड्यामुळे गणपती मुर्तीची विटंबना झाल्यास पालिका प्रशासन जबाबदार, चक्क गणपती बाप्पानेच पालिका आयुक्तांना दिलं निवेदन

ठाणे, १६ सप्टेंबर २०२३ | उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. याच खड्ड्यामुळे शहरात अनेक अपघात होत आहेत. याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा पालिका आयुक्तांना निवेदन देऊन खड्डे दुरुस्त करण्याची मागणी केली होती. मात्र पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून अद्याप देखील शहरातील खड्डे जैसे थे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उल्हासनगर महापालिकेच्या या दुर्लक्षपणामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, गणेश उत्सव मंडळानी संताप व्यक्त केला आहे. तसेच गणपती मिरवणुकी दरम्यान खड्ड्यामुळे एखादी दुर्घटना झाल्यास किंवा गणपती मुर्तीची विटंबना झाल्यास त्याला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत पालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नेते मनोज शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती बाप्पाचा वेश परिधान करत पालिका मुख्यालयात आयुक्त अजीज शेख यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले.

Published on: Sep 16, 2023 04:33 PM
बाबासाहेब आंबेडकर कमानीसाठी अजित पवार यांच्याशी चर्चा करणार अन्… सचिन खरात यांनी काय दिली ग्वाही?
Thane Mulund Toll Naka | मुख्यमंत्री शिंदे यांचा मोठा निर्णय, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना आनंदाची बातमी