गणेश नाईकांनी नवी मुंबईचं रक्त शोषलंय- जितेंद्र आव्हाड
गणेश नाईक आणि आयुक्तांनी माफी मागावी, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली. ते नवी मुंबईत बोलत होते.
गणेश नाईक आणि आयुक्तांनी माफी मागावी, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली. ते नवी मुंबईत बोलत होते. राजकीय दबावाखाली काम करत असाल तर आएएस होऊन येऊ नका, प्रशासक म्हणून बांगर यांना हे सर्व बाहेर काढायची काय गरज होती? गणेश नाईक तसेच बांगर दोघेही दोषी आहेत. सरळसरळ बोलले जात आहे, की 10 टक्के घेतले, मग या सर्व प्रश्नांची उत्तर द्यावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली. आमच्या साहेबांनी त्यांच्यावर अंत्यत विश्वासाने नवी मुंबई सोपवली होती. पण त्याने नवी मुंबईचे रक्त शोषले. त्यांनी सर्व नवी मुंबईकरांची माफी मागावी, असंही ते म्हणाले.
Published on: Jun 05, 2022 03:15 PM