Special Report | लालबागच्या राजासमोर वर्दीतली मुजोरी, बाजारपेठेतल्या गर्दीवेळी हे अधिकारी कुठं जातात?
लालबागचा राजा मंडप हा वादाचं केंद्र बनलंय का असा प्रश्न आहे. कारण कधी कार्यकर्त्यांची तर कधी पोलिसांची अरेरावी या परिसरात पाहायला मिळते. आता तर पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी तर एखाद्या गुंडाप्रमाणे अरेरावी केली.
लालबागचा राजा मंडप हा वादाचं केंद्र बनलंय का असा प्रश्न आहे. कारण कधी कार्यकर्त्यांची तर कधी पोलिसांची अरेरावी या परिसरात पाहायला मिळते. आता तर पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी तर एखाद्या गुंडाप्रमाणे अरेरावी केली. स्वत: मास्क न घालता संजय निकम यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली. मीडियाकर्मींनी पोलीस निरीक्षक संजय निकम यांना प्रेमाने, समजुतीने बोलण्यासं सांगितलं, त्यावेळी त्यांचा पारा आणखी चढला. धक्काबुक्की करताना पत्रकारांनी संजय निकम यांना हात लावू नका असं बजावलं. त्यावेळी या अधिकाऱ्याने हात काय पाय सुद्धा लावून दाखवतो थांब अशी गुंडगिरीची भाषा केली. पोलिसांच्या या वर्तनामुळे राज्याचे गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Published on: Sep 10, 2021 09:26 PM