बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट अजितदादांची लाडकी बहीण योजना, बघून तुम्हीही म्हणाल….

| Updated on: Sep 12, 2024 | 11:23 PM

बारामती शहरातील मांढरे कुटुंबीयांनी गणपती-गौरीच्या सजावटीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा देखावा साकारला आहे तर दुसरीकडे साताऱ्यातील वडूथ गावच्या वैशाली मारुती साबळे यांनीही लाडकी बहीण योजनेवर लक्षवेधी सजावट केली आहे. हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होतेय.

गौरी गणपतीच्या सणानिमित्त बारामती शहरातील मांढरे कुटुंबीयांनी गौराई सजावटीसाठी राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेची थीम साकारली आहे. लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये देऊन महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न या योजनेतून राज्य सरकारने केला आहे. हा विचार मनात घेऊन मांढरे कुटुंबीयांनी लाडकी बहीण योजनेची थीम साकारली आहे. तर साताऱ्यातील वडूथ गावातील महिलेनेही गौरी सजावटीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा आकर्षक देखावा तयार केला आहे. साताऱ्यातील वडूथ गावच्या वैशाली मारुती साबळे यांनी सध्या चर्चेत असणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा देखावा गौराईच्या निमित्ताने तयार केला आहे. यामध्ये लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून घेण्यापासून बँकेतून महिलांना पैसे मिळेपर्यंतचा देखावा सादर करण्यात आला आहे. ही योजना घराघरापर्यंत पोहचावी हा त्या मागचा उद्देश आहे. मांढरे कुटुंबीयांनी या नयनरम्य सजावटीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लाडकी बहीण औक्षण करत आहे. तर दुसरी त्यांना राखी बांधत आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, मुलींसाठी मोफत शिक्षण आदेश शासनाच्या योजनांची माहिती देणारी सजावट करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील महिला भगिनींनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Sep 12, 2024 12:51 PM
‘बाप आखिर बाप… विधानसभेत बापच बाजी मारणार’, आत्रामांच्या मुलीचा शरद पवार गटात प्रवेश अन् कुणी केला मोठा दावा?
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या ‘या’ भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड अन्…