Nashik Gangapur Dam | नाशिकमधील गंगापूर धरण 79 टक्के भरलं, पाण्याचा विसर्ग सुरु
नाशकात झालेल्या जोरदार पावसामुळे नाशिकचे गंगापूर धरण हे 79 टक्के भरले आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून 3000 क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पाणी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील 5 धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नाशिककरांवरील पाणीकपातीचं संकट दूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशकात झालेल्या जोरदार पावसामुळे नाशिकचे गंगापूर धरण हे 79 टक्के भरले आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून 3000 क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पाणी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील 5 धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नाशिककरांवरील पाणीकपातीचं संकट दूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.