गुन्हेगारांचं सोशल मीडियावर पुन्हा उदात्तीकरण, गुंड गजा मारणेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

| Updated on: May 19, 2024 | 5:48 PM

गुंड गजानन मारणे याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ हा गुंड गजानन मारणे याच्या समर्थकाने सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे सांगितले जात आहे तर मागील काही दिवसांपूर्वी सर्व गुन्हेगारांना पुणे पोलीस आयुक्तालयात एकत्रित करून निर्बंध घालून देण्यात आले होते.

गुन्हेगारांचं सोशल मीडियावर पुन्हा एकदा उदात्तीकरण करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. गुंड गजानन मारणे याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नंबर प्लेट नसलेल्या आणि मोठ्या आवाजाच्या गाड्या टोळक्याने फिरवण्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ हा गुंड गजानन मारणे याच्या समर्थकाने सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे सांगितले जात आहे तर मागील काही दिवसांपूर्वी सर्व गुन्हेगारांना पुणे पोलीस आयुक्तालयात एकत्रित करून निर्बंध घालून देण्यात आले होते. यावेळी सोशल मीडियावर गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्हिडिओ टाकण्यात मनाई करण्यात आली होती, असे असले तरी देखील मोठ्या प्रमाणात असे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवले जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Published on: May 19, 2024 05:46 PM
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती, पण… शरद पवारांचं मोठं वक्तव्य
प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी; नेमकं काय झालं?