Pune | पुण्यात भर रस्त्यात दोन टोळ्यांमध्ये गोळीबार, घटना CCTV मध्ये कैद

| Updated on: Oct 24, 2021 | 6:13 PM

पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोरमध्ये गँग वॉरमधून दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली होती. दोन टोळ्यांमध्ये भर रस्त्यात गोळीबार झाला होता. यात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुण्याजवळील उरळी कांचन परिसरात वाळू माफिया संतोष जगताप या गुंडावर झालेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. गँग वॉरमधून दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली होती. गुंड वाळू माफिया संतोष जगताप याच्यावर गोळीबार झाला होता.

पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोरमध्ये गँग वॉरमधून दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली होती. दोन टोळ्यांमध्ये भर रस्त्यात गोळीबार झाला होता. यात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पुण्याजवळील उरळी कांचन परिसरात वाळू माफिया संतोष जगताप या गुंडावर झालेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. गँग वॉरमधून दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली होती. गुंड वाळू माफिया संतोष जगताप याच्यावर गोळीबार झाला होता.

बचावासाठी जगताप याच्या अंगरक्षकाने बापूसाहेब खैरे या गुंडावर फायरिंग केली होती, त्याचाही त्या घटनेत मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंदापूर जवळून दोघांना ताब्यात घेतलं. शिवाय त्यांच्याकडून पिस्तुल आणि वाहन जप्त केल्याची माहिती आहे.

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 24 October 2021
Amol Mitkari | शहरांची नावे बदलून विकास होत नाही – अमोल मिटकरी