SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 1 September 2021

| Updated on: Sep 01, 2021 | 8:19 AM

पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पुढील 3-4 तास पावसाचा जोर अधिक असेल असंही नमूद करण्यात आलंय.

मुंबई हवामान विभागाने सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पुढील 3-4 तास पावसाचा जोर अधिक असेल असंही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. , 1 सप्टेंबरला राज्यात पालघरला ऑरेंज अ‌लर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट देण्यात आला आहे.

पुण्यात दिवसा 48 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यात हवामानात आर्द्रतेचं प्रमाण हे 95 टक्क्यांपर्यंत आहे. दिवसभरात अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे तीन ते चार दिवस पुण्यात अशाचप्रकारे हवामानाचं स्वरूप असणार आहे.

Sangli Congress | सांगली जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर कदम आणि वसंतदादा गटात संघर्ष
Nagpur ShivSena | नागपुरातील नाराज शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार