गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, राज्य महिला आयोगाकडून दखल

| Updated on: Feb 26, 2023 | 10:03 PM

VIDEO | गौतमी पाटीलचं चेंजिंग रुममध्ये चोरुन चित्रीकरण, राज्य महिला आयोगाने सायबर विभाग आणि पोलीस महानिरीक्षकांना दिले आदेश

मुंबई : गौतमी पाटील हिचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गौतमी पाटील हिचं चेंजिंग रूममध्ये चोरूम चित्रीकरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्यानंतर या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून देखील गंभीर दखल घेण्यात आली आहे. दरम्यान, महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरता कृती कार्यक्रम जाहीर करा, असा आदेश राज्य महिला आयोगाकडून सायबर विभाग आणि पोलीस महानिरीक्षकांना देण्यात आलेला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटवरवर याबाबतची माहिती दिली आहे. “लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे”, असं चाकणकर यांनी सांगितलं.

‘मी राजकारणात उगीच आलो’, सुजय विखे पाटील असं का म्हणाले? बघा व्हिडीओ
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिवसेनेत नवी खेळी, ठाकरे गटाच्या आमदारांना आणले अडचणीत