गौतमी पाटीलच्या लावणीला कुणीच आलं नाही?, लावणीला फक्त एकट्या बैलाची हजेरी

| Updated on: Apr 28, 2023 | 10:06 AM

VIDEO | गौतमी पाटीलच्या लावणीला एकट्या बैलाशिवाय कुणीच आलं नाही, तरीही गौतमीचा बैलासमोर दमदार डान्स

पुणे : गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण ठरलेलंय. गौतमी जिथे जाते तिथे गर्दी होतेच होते. गौतमीचा डान्स म्हटला तर टांगा पलटी घोडे फरार अशी प्रेक्षकांची गर्दी असते. बऱ्याचदा गौतमीच्या कार्यक्रमात बसायला जागा नसते म्हणून कुणी झाडावर जाऊन बसतो तर कुणी घराच्या छतावर जाऊन गौतमीच्या दिलखेचक अदा न्याहाळताना दिसतो. गौतमीच्या कार्यक्रमात इतकी गर्दी असते की पोलिसांना जमावावर लाठीमार करावा लागतो. पण काही केल्या गर्दी कमी होत नाही. मात्र पुण्यातील मुळशीत तर गौतमी चक्क एका बावऱ्या बैलासमोर थिरकताना दिसली. बावऱ्या नावाच्या बैलासमोर गौतमीने लावणी केली. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. पुणे तिथं काय उणे याचा प्रत्यय मुळशी तालुक्यात पाहायला मिळाला. मुळशीत विवाहच्या हळदी कार्यक्रमानिमित्त नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या वेळी बावऱ्या बैल गौतमीच्या स्टेजच्या समोर बांधला होता आणि त्यापुढे गौतमी नृत्य सादर करत होती. मुळशीतील सुशील हगवणे युवा मंच बावऱ्या फॅन्स क्लबने हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे पुणे जिल्ह्यात गौतमी पाटील हिच्या नृत्याची आणि बावऱ्या बैलाची चर्चा गाडा मालक शौकिनांमध्ये सध्या सुरू आहे.

Published on: Apr 28, 2023 10:06 AM
निशब्द! मरणानंतर ‘या’ अभिनेत्रीला 10 वर्षानंतर मिळणार न्याय! कोण आहे अरोपी?
मतदानावेळी दोन गट समोर समोर भिडले; भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने