नादचं न्हाय करायचा! पत्नीच्या वाढदिवसाला पठ्ठ्यानं दिलं थेट गौतमी पाटील हिच्या नृत्याचं सरप्राईझ
VIDEO | प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या हस्ते केक कापून पतीने केला आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा, कुठं झालं जबरदस्त सेलिब्रेशन?
बीड : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या नृत्याची क्रेझ आता एक दोन जिल्ह्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही तर संपूर्ण महाराष्ट्राभर झाली आहे. गौतमीच्या कार्यक्रमात हाणामाऱ्याही होताना दिसत असल्याने पोलिसांना बळाचा वापरही करावा लागत आहे. तरी देखील तिच्या नृत्यांचे कार्यक्रम आयोजित केले जात आहे. अशातच वाढदिवस साजरा करण्याचा सध्या अनोखा ट्रेंड सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. बीडमधील आष्टी तालुक्यातील निमगाव बोडखा येथील किरण गावडे यांनी पत्नी प्रगती गावडे यांचा साजरा केलेला वाढदिवस सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त चक्क नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एखाद्या महिलेच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा शो हा राज्यातला पहिलाच प्रयोग असल्याची चर्चा होत आहे. गौतमी पाटील हिच्या हस्ते केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. या अनोख्या वाढदिवसाला भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी तरुणाईनी देखील मोठी गर्दी केली होती. सध्या हा वाढदिवस जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.