अरे देवा ! गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात नको ते घडलं, बघा व्हिडीओ काय घडली घटना

| Updated on: May 09, 2023 | 8:10 AM

VIDEO | गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात धक्कादायक प्रकार, काय घडली नेमकी घटना? बघा व्हिडीओ

छत्रपती संभाजीनगर : डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) हिचा कार्यक्रम सोमवारी (8 मे) छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एक धक्कादायक प्रकार घडला. गौतमी पाटील मंचावर आपले नृत्य सादर करत होती. नेहमीप्रमाणे शेकडो चाहत्यांची गर्दी तिच्या समोर होती. पण कार्यक्रमादरम्यान एक अनपेक्षित घटना घडली. गौतमीचा डान्स पाहण्यासाठी एका दुकानाच्या पत्राच्या शेडवर बसेलेले चाहते थेट जमिनीवर कोसळले. गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण ठरलेलंय. गौतमी जिथे जाते तिथे गर्दी होतेच होते. गौतमीचा डान्स म्हटला तर टांगा पलटी घोडे फरार अशी प्रेक्षकांची गर्दी असते. बऱ्याचदा गौतमीच्या कार्यक्रमात बसायला जागा नसते म्हणून कुणी झाडावर जाऊन बसतो तर कुणी घराच्या छतावर जाऊन गौतमीच्या दिलखेचक अदा न्याहाळताना दिसतो. अशाच प्रकारे गौतमीचा डान्स पाहण्यासाठी एका दुकानाच्या पत्राच्या शेडवर चाहत्यांनी झुंबड केली होती. दुकानाचं पत्र्याचं शेड जास्त लोकांच्या वजनामुळे खाली कोसळलं. संबंधित घटनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेत कुणी जखमी झालंय का? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण ही घटना अतिशय भयानक आणि जीवघेणी होती. घटना घडली तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कार्यक्रम देखील बंद पडला.

Published on: May 09, 2023 08:05 AM
मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन, वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्वास
Special Report | 3 तास 20 मिनिटांत राज ठाकरे यांचा यू-टर्न?,कर्नाटक निवडणुकीत मनसेची भूमिका काय?