Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज, म्हणाली…

| Updated on: Dec 23, 2024 | 12:00 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून विभाग अध्यक्ष मनीष धुरी आणि कुशल धुरी यांच्या माध्यमातून अंधेरी पश्चिमेला चार दिवसीय खाद्य महोत्सवाचे आयोजन

महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष मनीष धुरी आणि कुशल धुरी यांच्या माध्यमातून अंधेरी पश्चिमेला चार दिवसीय खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. रविवारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने आपली उपस्थिती लावली, यावेळी कुशल धुरी यांच्या वाढदिवस निमित्ताने गौतमी पाटील हिच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला, त्याचसोबत गौतमी पाटील तिला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अंधेरीकरांनी गर्दी केली. गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम देखील यावेळी पार पडला. यावेळी गौतमीच्या नृत्यावर अंधेरीकर थिरकल्याचे देखील पाहायला मिळाले. लहान थोरापासून सर्वच प्रेक्षकांनी यावेळी गौतमी पाटील हिच्या नृत्याचा आस्वाद घेतला. बघा काय म्हणाले गौतमी पाटील?

Published on: Dec 23, 2024 12:00 PM
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद? पुन्हा हातमिळवणी करणार?
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला