मला बी आरक्षण द्या की… सबसे कातिल गौतमी पाटील हिची मागणी; आरक्षणाच्या वादात उडी
मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना कुणबी समाजातून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे या मागणीवर कायम राहत शिंदे सरकारला २४ डिसेंबर पर्यंतची डेटलाईन दिली आहे. आता राज्यात सुरू असणाऱ्या आरक्षणाच्या वादात राज्यातील प्रसिद्ध नृत्यांगना सबसे कातिल गौतमी पाटील हिने उडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
पुणे, १३ डिसंबर २०२३ : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजताना दिसतोय. आरक्षणाच्या वादावरून सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच एकमेकांविरोधात आक्रमक होत टिका-टिप्पणी करताना दिसतेय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाजाचे लढवय्ये मनोज जरांगे पाटील यांनी आपला निर्धार कायम ठेवत राज्यभरात आता चौथ्या टप्प्यातील दौरा सुरू केला आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना कुणबी समाजातून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे या मागणीवर कायम राहत शिंदे सरकारला २४ डिसेंबर पर्यंतची डेटलाईन दिली आहे. आता राज्यात सुरू असणाऱ्या आरक्षणाच्या वादात राज्यातील प्रसिद्ध नृत्यांगना सबसे कातिल गौतमी पाटील हिने उडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. गौतमी पाटील हिने पुण्यात माध्यमांशी संवाद साधला यावेळी तिने मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे असे भाष्य केले आहे. तर मला देखील आरक्षण हवंय अशी मोठी मागणीही गौतमी पाटील हिने केली आहे.