Rajesh Tope | कोरोनावरील लस घ्या, अन्यथा… राजेश टोपे यांनी टीन-एजर्संना टोकलं
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी वाढत्या कोरोना (Corona) रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्यांसंदर्भात टीव्ही 9 मराठीशी संपर्क साधला. राज्यात पूर्ण लॉकडाऊन (Lockdown) लागणार का? 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण, मिनी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू, रात्रीच्या अनावश्यक सेवा बंद करणं, बाजारापेठेतील गर्दी, लग्न समारंभात होणारी गर्दी यासंदर्भात भाष्य केलं.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी वाढत्या कोरोना (Corona) रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्यांसंदर्भात टीव्ही 9 मराठीशी संपर्क साधला. राज्यात पूर्ण लॉकडाऊन (Lockdown) लागणार का? 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण, मिनी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू, रात्रीच्या अनावश्यक सेवा बंद करणं, बाजारापेठेतील गर्दी, लग्न समारंभात होणारी गर्दी यासंदर्भात भाष्य केलं. राज्यात 15 ते 18 वयोगटातील 60 लाख मुलांचं लसीकरण करायचं असून हे दररोज तीन लाख प्रमाणं 20 दिवसात होऊन जाईल, असं राजेश टोपे म्हणाले. मुलांनी कोरोना लस घेतली नाहीतर पिझ्झा बर्गर देखील मिळणार नाही, असं राजेश टोपे म्हणाले.
15 ते 18 वयोगटातील लसीकरण जलदगतीनं
15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण वेगानं करत आहोत. राज्यातील 60 लाख मुलांचं लसीकरण करायचं आहे. दररोज 3 लाख मुलांचं लसीकरण याप्रमाणं प्रयत्न करत आहोत. 15 ते 20 दिवसांमध्ये हे लसीकरण होऊन जाईल. किशोरवयीन मुलांना स्वत: सुरक्षित राहायचं असेल तर कुठं जायचं असेल तर लसीकरण करुन घ्या. बर्गर आणि पिझ्झा घ्यायचा असला तरी लस बंधनकारक त्यामुळं लसीकरण करुन घ्या, असं आवाहन राजेश टोपे यांनी किशोरवयीन मुलांना केलं.