मग आता का वाईट वाटतंय? भाजप नेत्यानं शरद पवार यांना डिवचलं

| Updated on: Feb 07, 2024 | 5:25 PM

भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीवर दिलेल्या निकालानंतर अजित पवार यांचं अभिनंदन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचा निर्णय हा न्यायप्रविष्ट झाला होता आणि न्यायालयाने यावर योग्य निर्णय दिल्याचे भाष्य केले

मुंबई, ७ फेब्रुवारी २०२४ : लोकशाहीमध्ये ज्यांचं बहुमत त्यांचाच पक्ष असल्याचे म्हणत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीवर दिलेल्या निकालानंतर अजित पवार यांचं अभिनंदन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचा निर्णय हा न्यायप्रविष्ट झाला होता आणि न्यायालयाने यावर योग्य निर्णय दिला आहे. शेवटी यावर निवडणूक आयोग मॅनेज झाला आहे. या मागे छुपी शक्ती असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून होत आहे. त्याचा समाचारही मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आहे. जसे पेरतो तसे उगवते, मागे पवार साहेबांनी तेच केलं. पवार साहेबांनी पक्ष फोडला नव्हता का? पवार साहेब बाहेर पडून मुख्यमंत्री झाले नव्हते का ? ही त्यांची परंपरा आहे मग आता का वाईट वाटते ? असा सवाल ही गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे.

Published on: Feb 07, 2024 05:25 PM
राष्ट्रवादीचा निकाल कसा लागणार? तुमच्या मनातला एकमेव प्रश्न; विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टच म्हटलं…
मनसे लवकरच महायुतीत येणार? MNS सोबत युती करण्यासाठी महायुतीची चाचपणी सुरू