खडसेंना 15 वर्ष लाल दिवा आणि 12 खाती मिळाली पण विकासकामं करण्यात अपयश, आता दुकानदारी बंद करावी: गिरीश महाजन
महाराष्ट्रात सध्या नगर पंचायत निवडणुकीचं (Maharashtra Nagar Panchayat Election) वारं सुरु आहे. बोदवड येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंवर (Eknath Khadse ) जोरदार टीका केलीये.
जळगाव : महाराष्ट्रात सध्या नगर पंचायत निवडणुकीचं (Maharashtra Nagar Panchayat Election) वारं सुरु आहे. बोदवड येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंवर (Eknath Khadse ) जोरदार टीका केलीये. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीसाठी पळतो, अन् स्वतःच्या मतदारसंघाचा विकास मात्र भकास आणि म्हणे मोठा नेता, असे म्हणत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी नगरपंचायत निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंवर जोरदार टीका केली.