Girish Mahajan यांच्या मुलीच्या लग्नात शिरला चोर, माजी नगरसेवकाच्या खिशातून पैसे चोरण्याचा प्रयत्न
गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नात घुसून पाकिट चोरण्यासाठी आलेल्या या चोरट्याला लग्नात आलेल्या इतरांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.
लग्नाचे कार्यक्रम म्हटले की त्यात पाकिटमार आलेच! आता तर चक्क गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नातही पाकिटमारानं डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. पण पाकिटमाराचा हा प्रयत्न फसला. पाकिट चोरण्यासाठी लग्नात घुसलेल्या या चोरट्या (Thief)ला मग लग्नातील इतर कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिलाय. हा सगळा प्रकार भाजपचे आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या मुलीच्या लग्नात घडल्यानं चर्चा झाली नसती तरच नवल! नेमकं घडलही तेच! आता या चोरट्याला चोप दिल्यानंतर पोलिसांच्या हवाले केलं जाईल. पण थेट गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नात घुसून पाकिट चोरण्यासाठी आलेल्या या चोरट्याला लग्नात आलेल्या इतरांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.