Breaking News : गिरीश महाजन होणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री?; दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग

| Updated on: Jun 07, 2024 | 5:14 PM

देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिल्यास पुढे काय करायचं..? फडणवीसांना भाजपच्या प्रदेशाध्यपदाची जबाबदारी द्यायची का? फडणवीसांकडील गृहमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं? असे अनेक सवाल आहेत. त्यामुळे आता नेमकं काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच मोठी बातमी समोर आली आहे.

Follow us on

गेल्या दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत झालेल्या महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आहे. इतकंच नाहीतर यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये यासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले मात्र तरीही फडणवीस हे आपल्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर महाराष्ट्रात भाजपचा उपमुख्यमंत्री कोण असेल? त्यांच्याकडे असणारं गृहमंत्री पदाचं खातं नेमकं कोणाकडे दिलं जाणार? असे अनेक सवाल असताना सूत्रांकडून मोठी माहिती समोर येत आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले भाजपचे नेते गिरीश महाजन हे महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्रीपदी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गिरीश महाजन हे सध्या राज्यातील भाजपचे दोन नंबरचे नेते आहेत. महाजन यांची पक्षाचे संकटमोचक नेते म्हणून ओळख आहे. याशिवाय ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते मानले जाता. त्यामुळे अधिकृत निर्णय काय येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.