Girish Mahajan Meet Amit Shah : मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, गिरीश महाजनांनी घेतली अमित शाहांची भेट

| Updated on: Jul 29, 2022 | 9:17 AM

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार येऊन जवळपास एक महिना झाला आहे. मात्र, अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. दरम्यान, गिरीश महाजनांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली.

मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या हलचालींना वेग आल्याचं दिसतंय. भाजप नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महाजन यांच्या दिल्ली वारीनंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराल वेग आलाय. राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार एकूण 26 दिवस उलटून गेले आहेत. तरीही राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. दुसरीकडे भाजप नेते गिरीश महाजन (girish mahajan) आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार (abdul sattar) हे दिल्लीत पोहोचले आहेत. सत्तार आणि महाजन हे चांगलं मंत्रिपद मिळावं म्हणून लॉबिंग करत असल्याचं सांगितलं जात आहे. महाजन यांनी तर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं असलं तरी फडणवीस यांना अजूनही कोणतंच खातं देण्यात आलेलं नाही. त्यामुळे महिना होत आला तरी शिंदे सरकारात फडणवीस बिनखात्याचेच मंत्री आहेत.

Published on: Jul 29, 2022 09:17 AM
दहीहंडी सणाला राष्ट्रीय सण म्हणून घोषित करून शासकीय सुट्टी जाहीर करण्याची प्रताप सरनाईक यांची मागणी
Ajit Pawar : उपमुख्यमंत्र्यांचा आकडा चुकीचा, आमच्या सरकारमध्ये 7 लोकांनी सुरुवातीला शपथ घेतली, अजित पवारांचा पलटवार