Chhagan Bhubal : राजे, तुम्ही वंशज, सर्वांना समान न्याय द्या; छगन भुजबळ यांची आर्त हाक

| Updated on: Nov 27, 2023 | 1:29 PM

पुण्यात माध्यमांशी बोलत असताना छगन भुजबळ यांनी संभाजीराजे छत्रपती यांना आवाहन केले आहे. भुजबळ म्हणाले, संभाजीराजे यांच्याबद्दल मनात आदर आहे. महाराष्ट्रातील सर्व घटक, समाज हे तुमचेच आहे. त्यांना समान न्याय द्या, असे आवाहन संभाजीराजे यांना छगन भुजबळांनी केलंय

पुणे, २७ नोव्हेंबर २०२३ : छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. ‘भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत.’, असा हल्लाबोलही संभाजीराजे यांनी केला. दरम्यान, आज पुण्यात माध्यमांशी बोलत असताना छगन भुजबळ यांनी संभाजीराजे छत्रपती यांना आवाहन केले आहे. भुजबळ म्हणाले, संभाजीराजे यांच्याबद्दल मनात आदर आहे. संभाजीराजे ज्या गादीवर बसले आहेत. त्या गादीचं काम म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आपला आहे. आपण गादीचे वंशज आहात. याचा अर्थ म्हणजे महाराष्ट्रातील सर्व घटक, समाज हे तुमचेच आहे. त्यांना समान न्याय द्या, अशी आर्त हाक संभाजीराजे यांना भुजबळांनी दिली.

Published on: Nov 27, 2023 01:28 PM
26/11 च्या रात्री मुंबईत दहशतवादी शिरले, मुंबई पोलिसांना कुणी केला फोन अन्…
काही बड्या नेत्यांचा जालन्यात दंगल घडवण्याचा प्लॅन होता; शिवसेना नेत्याचा मोठा दावा