‘मला बच्चू कडू यांच्या जागी आमदारकी द्या’, कुणी केली थेट मागणी?

| Updated on: Aug 10, 2023 | 7:19 PM

VIDEO | राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत असलेल्या आरपीआय खरात गटाच्या अध्यक्षाला विधानपरिषदेचे वेध! काय केली थेट मागणी?

पुणे, १० ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत असलेल्या आरपीआय खरात गटाच्या अध्यक्षाला विधानपरिषदेचे वेध लागल्याचे समोर आले आहे. तर आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी मला बच्चू कडू यांच्या जागी आमदारकी द्या, अशी थेट मागणी केली आहे. महायुतीच्या सत्तेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आरपीआय खरात गट सहभागी झालं आहे. आता याच घटक पक्षाला विधान परिषदेवर घेतलं जाईल, अजित पवार त्यांचा नक्कीच विचार करतील. असा विश्वास पक्षाचे अध्यक्ष सचिन खरात यांना आहे. पत्रकार परिषद घेऊन खरात यांनी असं जाहीर केलं असलं तरी ही माझी मागणी नाही, असं ही ते म्हणतायेत. मात्र आजवरच्या अनेक सत्ताधारी पक्षांनी अपवाद वगळता घटक पक्षांवर अन्याय केलाय, अशा परिस्थितीत सचिन खरात हे अपवाद ठरतील की अन्याय झालेला घटक पक्ष ठरतील हे लवकरच स्पष्ट होईल. बच्चू कडू ऐवजी माझ्या नावाचा विचार करावा असा उल्लेख ही खरात यांनी केला आहे.

Published on: Aug 10, 2023 07:19 PM
‘मणिपूर विषय डायव्हर्ट करण्यासाठी लोकसभेत भाजपचा गलिच्छ आरोप’, मनसे आमदाराचा हल्लाबोल
‘बाळासाहेबांचं स्मारक राज ठाकरे यांच्याशिवाय दुसरं कोणी बनवू शकत नाही’, मनसे आमदाराला विश्वास