‘बिहार पॅटर्न राबवा, मला मुख्यमंत्रीपद द्या…’, अमित शाहांसमोर दादांचा प्रस्ताव? ‘द हिंदू’ चा दावा काय?

| Updated on: Sep 10, 2024 | 5:00 PM

भाजप १५० तर अजित पवार गट ७० जागांवर लढण्यास इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे. सिटींग जागा सोडणार नसून ३ ते ४ जागांवर अदलाबदलीसाठी तयार असल्याचे दादा गटाने सांगितले, असा दावा द हिंदू या इंग्रजी दैनिकांने केला आहे.

Follow us on

बिहार पॅटर्न राबवा, मला मुख्यमंत्रीपद द्या…असा प्रस्ताव राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यासमोर मांडला असल्याचे वृत्त द हिंदू या इंग्रजी दैनिकांने दिलंय. मुंबई एअरपोर्टवर झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी शहांसमोर हा प्रस्ताव ठेवल्याचा दावा द हिंदू या इंग्रजी दैनिकांने केला आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीत २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत करा, असा भाजपचा एकनाथ शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला प्रस्ताव असल्याचेही द हिंदू या इंग्रजी दैनिकांने सांगितलं. बिहार पॅटर्नचा दाखला दोत अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली असून महायुतीत जागावाटपाची भांडणं पाहता अमित शाहांना २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी, असं भाजप नेत्यांनी सांगितलं. इंदापूर, अमरावती सारख्या जागांवर तिढा आहे. त्यामुळे या जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती मिळतेय. बघा व्हिडीओ