अजमेर जाकर मेरे लिये…; मुस्लिम बांधवांना प्रणिती शिंदे यांनी काय घातली भावनिक साद?
देशातील भाजप सत्तेमुळे गोरगरीब जनता, अल्पसंख्याक आणि दलित हे असुरक्षित आहेत. महाराष्ट्र राज्यात आणि देशात काँग्रेस आली तर सर्व सुरक्षित राहतील असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या. सोलापूर येथील दोनशे मुस्लिम बांधव अजमेरला रवाना होत असताना प्रणिती शिंदे यांनी मुस्लिम बांधवांना भावनिक साद घातली
सोलापूर, ८ फेब्रुवारी २०२४ : सोलापूर शहरातील दोनशे मुस्लिम बांधव अजमेर दर्गाहसाठी रवाना होत असताना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. देशातील भाजप सत्तेमुळे गोरगरीब जनता, अल्पसंख्याक आणि दलित हे असुरक्षित आहेत. महाराष्ट्र राज्यात आणि देशात काँग्रेस आली तर सर्व सुरक्षित राहतील असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांचे दौरे वाढल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूर येथे दौऱ्यावर असताना शहरातील दोनशे मुस्लिम बांधव अजमेर दर्गाहसाठी रवाना होत असताना प्रणिती शिंदे यांनी मुस्लिम बांधवांना भावनिक साद घातल्याचे पाहायला मिळाले. प्रणिती शिंदे म्हणाल्या, अजमेर जाकर मेरे लिये दुआ करो और काँग्रेस फिर एक बार देश में सत्ता स्थापन करे….
Published on: Feb 08, 2024 05:29 PM