दिल्लीत जावं या विधानापासून ते टोलपर्यंत, विरोधकांच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस!

| Updated on: Oct 10, 2023 | 12:07 PM

tv9 Marathi Special Report | दिल्लीत जावं या विधानापासून ते टोलपर्यंत विरोधकांच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस, टोलमुक्तीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विरुद्ध राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा सामना का रंगलाय? बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई, १० ऑक्टोबर २०२३ | दिल्ली जाण्याच्या विधानानंतर टोलवरुन देवेंद्र फडणवीस टार्गेटवर आहेत. काल राज्यातल्या टोलनाक्यांवर चारचाकी वाहनांना टोल लागत नसल्याचं फडणवीस यांनी सांगितले. टीका सुरु झाल्यानंर काही टोलनाक्यांवर टोलमुक्ती दिल्याचं स्पष्टीकरण फडणवीसांच्या कार्यालयानं दिलं. मात्र तोपर्यंत मनसेच्या ट्विटरवरुन राज ठाकरेंच्या जुन्या विधानाची आठवण करुन दिली गेली. यानंतर फडणवीसांनी दिल्लीत जावं या संजय शिरसाटांच्या विधानानं नवा वाद सुरु झाला. भाजपनं शिरसाटांना आपल्या क्षमतेनुसार बोलण्याचा सल्ला दिला. मात्र हा वाद थांबत नाही तोच शिंदे गटाच्या मनिषा कायंदेंनीही फडणवीस दिल्लीत गेल्यास मराठी माणसाला आनंदच होईल, असं विधान केलं आणि शिंदे तो निर्णय हायकमांड करेल असं म्हणाले. दरम्यान शिरसाटांनी त्यांच्या विधानावर खुलासा केला. मात्र शिरसाट सुद्धा फडणवीस सारख्या नेत्यांना सल्ला द्यायला लागल्याचं म्हणत राऊतांनी फडणवीसांना डिवचलं. बघा राऊतांनी पुन्हा काय केली टीका?

Published on: Oct 10, 2023 12:07 PM
Raj Thackeray यांच्या ‘त्या’ एका इशाऱ्यानंतर विना टोल वाहनं सुसाट !
Raj Thackeray यांच्याकडून पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यापासून ते उद्धव ठाकरे यांची पोलखोल