Goa Assembly Election 2022 | Goa मध्ये 40 जागांसाठी मतदानाला सुरुवात

| Updated on: Feb 14, 2022 | 9:15 AM

गोवा विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावलीय. गोव्यात काँग्रेस, (Congress) मगोप, भाजप (BJP) यांच्यात लढत व्हायची. मात्र, यावर्षी ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीनं ताकद लावली आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावलीय. गोव्यात काँग्रेस, (Congress) मगोप, भाजप (BJP) यांच्यात लढत व्हायची. मात्र, यावर्षी ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीनं ताकद लावली आहे. गोव्यात सध्या भाजपचं सरकार आहे. गेल्या दहावर्षांपासून गोव्यात भाजप सरकार असून यावेळी मतदार कुणाला कौल देतात हे पाहावं लागणार आहे.गोव्यातील 40 जागांसाठी 301 उमदेवार रिंगणात आहेत. गोव्यातील सत्ता मिळवण्यासाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस यांनी ताकद लावली आहे. आता गोव्यातील जनता कुणाला सत्ता देणार हे आज होणाऱ्या मतदानावरुन ठरणार आहे.

 

सरकार गेल्याने विरोधकांना फ्रस्ट्रेशन आलंय, आदित्य ठाकरे यांचा जोरदार टोला
सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील पुतळ्याचं अनावरण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती