Special Report | Goa BJPमध्ये बंड, Manohar Parrikar यांचे सुपुत्र अपक्ष!-TV9

| Updated on: Jan 21, 2022 | 8:41 PM

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी आज गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरणार असल्याची घोषणा केलीय.

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) रणधुमाळीत मोठी घडामोड आज पाहायला मिळाली. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी आज गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरणार असल्याची घोषणा केलीय. ‘मतदारांनी केवळ मनोहर पर्रिकरांना मतदान दिलं होतं. कारण पर्रिकर हे मूल्यांच्या बाजूने होते. त्यामुळे मी या मुद्द्यांच्या बाजूने आहे. माझ्या वडिलांनी पक्ष मजबूत केला. मलाही पणजीत (Panaji) मजबूत करायचा आहे. मला पणजीतून उमेदवारी दिली नाही. केवळ संधी साधुला तिकीट दिलं आहे. दोन वर्षापूर्वी पक्षात आलेल्यांना तिकीट दिलं. त्यामुळे मी पणजीतून अपक्ष म्हणून लढणार आहे’, अशी मोठी घोषणा उत्पल पर्रीकर यांनी आज केलीय.

‘मी खूप मोठी रिस्क घेत आहे. मी फार कठीण मार्ग निवडला आहे. माझ्या करियरवर खूपजणांनी चिंता व्यक्त केली. माझ्या राजकीय भवितव्याची कुणी चिंता करू नये, गोव्याची जनता माझी चिंता करेल’, असंही उत्पल पर्रीकर म्हणाले. ‘गेल्यावेळीही मला संधी नाकारली आहे. आताही नाकारले आहे. इथल्या लोकांना माहीत आहे. हा मनोहर पर्रिकराच्या पार्टीतील निर्णय वाटत नाही. कधी तरी जनतेसाठी थांबावं लागतं. मी अपक्ष लढतोय. माझं राजकीय करिअर मी पणजीच्या लोकांच्या हाती ठेवलं आहे. मी कोणत्याही पद आणि मंत्रीपदासाठी मी लढत नाही. मूल्यांसाठी माझी लढाई आहे. हे युद्ध कठीण आहे. मला काही तरी मला मिळेल यासाठी मी काही करत नाही. पणजीचे लोक 30 वर्ष माझ्या लोकांसोबत होते. येथील वर्ग उच्च शिक्षित आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत जात आहे. माझ्या वडिलांची जी इमेज होती तीच इमेज मला द्यायची होती. मी पक्षातून त्यासाठी प्रयत्न केला. पण त्यात मी यशस्वी झालो नाही’, अशी खंतही यावेळी उत्पल यांनी व्यक्त केलीय.

Published on: Jan 21, 2022 08:41 PM
राणीच्या बागेतील प्राण्याच्या नावांवरून BJP-Shivsena सामना
Nana Patole | Why I killed Gandhi? या Amol Kolheच्या चित्रपटाला आमचा विरोध : नाना पटोले – tv9