Goa Assembly Election Result 2022 LIVE :गोव्यातला पहिला निकाल हाती,भाजपचे उमेदवार विजय

| Updated on: Mar 10, 2022 | 12:19 PM

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पणजी मतदारसंघातून पराभव, भाजपचे बाबुश मोन्सरात विजयी.

मतमोजणी सुरु झाल्यानंतर अडीच तासांच्या अखेरीस (सकाळी 10.30 वाजता) शिवसेनेला (Shivsena) पाव टक्के मतं मिळाल्याचं दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission)अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25% मतवाटा मिळाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तूर्तास 1.06% मतं पडली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आकडे ‘नोटा’ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहेत. कारण 1.17% मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे. भाजपला सर्वाधिक मतवाटा असून त्यानंतर अनुक्रमे काँग्रेस, मगोप, आप, तृणमूल काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पक्ष यांचा क्रमांक लागतो. अजूनही मतमोजणी सुरु असून मतांचा वाटा पुढे-मागे होण्याची शक्यता आहे. तर गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पणजी मतदारसंघातून पराभव, भाजपचे बाबुश मोन्सरात विजयी

Published on: Mar 10, 2022 11:46 AM
योगी बाबा 300 के पार, फिर से योगी सरकार, कार्यकर्त्यांची बॅनरबाजी
गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरांनी मतमोजणी केंद्र सोडलं