कर्नाटकातील गोकाक धबधबा प्रवाहित, धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
कर्नाटकातील गोकाक धबधबा प्रवाहित झाला आहे. या धबधब्यावर पर्यटकांनी अलोट गर्दी केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी याठिकाणी बॅरिकेट्सही लावले आहेत.
कर्नाटकातील गोकाक धबधबा प्रवाहित झाला आहे. या धबधब्यावर पर्यटकांनी अलोट गर्दी केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी याठिकाणी बॅरेकेट्सही लावले आहेत. निसर्गाचं विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. याठिकाणी पोलीस बंदोबस्तदेखील वाढवण्यात आला आहे. देशभरातील पर्यटकांचं आकर्षण असलेला बेळगाव जिल्ह्यातील गोकाकचा धबधबा प्रसिद्ध आहे. बेळगाव जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी, नाले आणि ओढे खळाळून वाहत आहेत. गोकाक धबधबासुद्धा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे.
Published on: Jul 17, 2022 01:56 PM