धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा व्हिडीओ तुम्हालाही भरेल धडकी

| Updated on: Jul 23, 2024 | 3:09 PM

बेळगाव जिल्ह्यातील गोकाकच्या धबधब्याने मुसळधार पावसामुळे रौद्र रूप धारण केले आहे. मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे धबधब्याचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. धबधब्याचे हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी....

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रवाहित झालेल्या बेळगाव जिल्ह्यातील गोकाकच्या धबधब्याने मुसळधार पावसामुळे रौद्र रूप धारण केले आहे. मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे धबधब्याचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. धबधब्याचे हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील पर्यटक गर्दी करत आहेत.पाणी वेगाने कोसळत असल्याने त्याचे तुषार दूरवर उडत आहेत. पोलिसांनी देखील अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त ठेवला आहे. कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने गोकाक धबधबा आणि हिडकल धरण पाहायला जाण्यासाठी विशेष बस सेवा सुरू केली आहे. याचा लाभ पर्यटकांना होत आहे. पावसाळ्यामुळे अनेक निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यातच, महाराष्ट्रातील धबधब्याची ठिकाणं असलेल्या स्थळांना पर्यटक भेटी देत आहेत. जुनच्या पहिल्याच आठवड्यात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे विविध जिल्ह्यातील धबधबे वाहू लागले आहेत, ओढ्यांना आणि नद्यांनाही पाणी आलं आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक धबधबाही काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून धबधबा पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे.

Published on: Jul 23, 2024 03:09 PM