वरुण राजा कधी होणार प्रसन्न? ‘या’ राज्यात बळीराजा पावसाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत

| Updated on: Jun 14, 2023 | 6:40 AM

VIDEO | मृग नक्षत्र लागल्यानंतरही उन्हाचा तडाखा कायम, शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात मृग नक्षत्र लागून 10 ते 15 दिवसाचा कालावधी लोटला आहे. असे असताना आजही उन्हाचा तडाखा कायम आहे . मात्र काही दिवसात पावसाळा सुरू होणार असून शेतकरी सुद्धा आपल्या शेतीच्या कामासाठी लागलेला असल्याचे पाहावयास मिळत आहे. शेतकरी यांनी आपल्या शेतात पहिल्यांदा धान पिकाच्या लागवडी पूर्वी नांगरणी करून ठेवलेली आहे. बियाणे लागवडी करिता पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या नजरा या आकाशाकडे लागल्या असून पावसाचे आगमन केव्हा होते, याच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे. पाऊस कधी होईल आणि शेतीच्या कामाला केव्हा सुरुवात करतो अशा प्रतीक्षेत गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आहेत. आता वरून देव केव्हा या जिल्हावर प्रसन्न होऊन पावसाचे आगमन होते हे पाहावे लागणार आहे.

Published on: Jun 14, 2023 06:40 AM
पद धोक्यात आल्याच्या वृत्तानं शिंदेंच्या मंत्र्यांचं टेन्शन वाढलं; फडणवीसांसोबत केली पाऊणतास चर्चा!
शेतातील पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड, लढवली अनोखी शक्कल