नाशिक ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, प्रवास होणार अधिक सुखकर
VIDEO | 'लालपरी'च्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस दाखल, नाशिक-पुणे दरम्यान या इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. नाशिक विभागात आठ इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या असून नाशिक आणि पुणे दरम्यान 16 बस फेऱ्या दिवसाला सुरू असतील
नाशिक, १४ ऑगस्ट २०२३ | नाशिक आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता 100% इलेक्ट्रिक असलेल्या बस दाखल झाल्या आहेत. या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस सिस्टीम, ड्रायव्हर अल्कोहोल अलार्म सिस्टीम, सीट बेल्ट अलार्म सिस्टीमसह अत्याधुनिक वाहनांना असलेले एडीएस सिस्टीम देखील बसवण्यात आली असून एकदा चार्ज केल्यानंतर ही बस सुमारे तीनशे किलोमीटरचा पल्ला गाठू शकणार आहे. विशेष म्हणजे या बसमध्ये ड्रायव्हरने जर मद्यपान केलं असेल किंवा धूम्रमान केलं असेल तर त्याचा अलार्म देखील वाजणार आहे. नाशिक विभागात सध्या अशा आठ इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या असून नाशिक आणि पुणे दरम्यान सध्या 16 बस फेऱ्या दिवसाला सुरू झाल्या आहेत. नेमकी ही इलेक्ट्रिक बस आहे तरी कशी आणि काय आहेत यांचे फीचर्स जाणून घ्या…
Published on: Aug 14, 2023 04:27 PM