Breaking | एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, वेतनासाठी 112 कोटींचा निधी, अजित पवारांचा निर्णय

Breaking | एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, वेतनासाठी 112 कोटींचा निधी, अजित पवारांचा निर्णय

| Updated on: Oct 26, 2021 | 9:05 PM

परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून 112 कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. त्यानुसार आज तातडीने निधी वितरीत करण्यात आला आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून 112 कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. त्यानुसार आज तातडीने निधी वितरीत करण्यात आला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

Special Report | पती समीर वानखेडेंच्या बचावासाठी पत्नी क्रांती रेडकर मैदानात
Nagpure | नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये खाजगी पेथॉलॉजी लॅबच्या दलालांचा बोलबाला