Gopichand Padalkar | बैलगाडा शर्यत भरवल्यानं आमदार गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल

| Updated on: Aug 20, 2021 | 10:11 PM

बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यासह इतर 41 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सांगली जिल्ह्यातील झरे गावात भव्य अशी बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. काहीही झाले तरी शर्यत घेणारच असा निश्चय पडळकर यांनी केला होता.

परवानगी नसतानादेखील बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यासह इतर 41 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सांगली जिल्ह्यातील झरे गावात भव्य अशी बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. काहीही झाले तरी शर्यत घेणारच असा निश्चय पडळकर यांनी केला होता. नंतर पडळकर समर्थकांनी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास एका मैदानात धावपट्टी तयार केली आणि पुढच्या काही तासांत तिथे स्पर्धा भरवली. या प्रकारानंतर आता सांगलीतील प्रशासनाने कायदेशीर कारवाई केली आहे. पडळकर यांच्यावर जिल्हाधिकारी तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धुडकावल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. पडळकर तसेच इतर 41 जणांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Amol Mitkari | अपयशी नेत्याला काय उत्तर देणार, राज ठाकरेंना मिटकरींचं उत्तर
Special Report | पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंचा आत्महत्येचा इशारा