Gopichand Padalkar | MPSC बाबत अजितदादांनी शब्द पाळला का? गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
अजितदादा, 31 जुलै तारीख उलटून गेलीय, एमपीएससीच्या रिक्त जागांसंदर्भातल्या घोषणेचं काय झालं? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
कदाचित पुन्हा एकदा स्वप्नील लोणकर या होतकरू विद्यार्थ्याने निवडलेला मार्ग आणखी विद्यार्थ्यांनी निवडावा, असं या प्रस्थापितांच्या सरकारला वाटतंय.
म्हणूनच काय अजित पवारांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला नाही. याअर्थी अधिवेशनातही अजितदादा धडधडीत खोट बोलत होते. अजित पवारांनी ३१ जुलै पर्यंत MPSC च्या सर्व जागा भरू सांगितले होते आणि बाहेर येऊन फक्त आयोगावरील ‘सदस्यांच्या’ जागा भरु असे सांगितले होते. आता 31 जुलै उलटून गेलीये..
MPSC च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नियुक्ता तर सोडाच साध्या MPSC आयोगावरील सदस्यांच्या नियुक्त्या तरी केल्यात का? या प्रस्थापितांना फक्त आपल्याच पोरा बाळांच्या आमदारकीचं आणि खासदारकीचं पडलेलं आहे.. अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलीय.