Gopichand Padalkar LIVE | बैलगाडा शर्यत यशस्वी करुन दाखवल्यानंतर गोपीचंद पडळकरांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Aug 20, 2021 | 9:23 AM

“बैलगाडा हा कोणताही समर्थक नाही. बैलगाड्याला जात, पात, धर्म, प्रांत काहीही नाही… गोवंश हा वाचवला पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे, अशी आमची साधी भूमिका आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

सरकारच्या आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली आहे. आज सकाळी पहाटे पाच वाजता पडळकर समर्थकांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करुन शासन आणि प्रशासनाला कात्रजचा घाट दाखवला. बैलगाडा शर्यत यशस्वी करुन दाखवल्यानंतर गोपीचंद पडळकरांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

तुमच्याच समर्थकांनी ही शर्यत पार पाडली का? असा प्रश्न विचारल्यावर पडळकरांनी दावा खोडून काढत, “बैलगाडा हा कोणताही समर्थक नाही. बैलगाड्याला जात, पात, धर्म, प्रांत काहीही नाही… गोवंश हा वाचवला पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे, अशी आमची साधी भूमिका आहे. जर आपण गोवंश जतन केला नाही, तर येणाऱ्या पिढीला आपल्याला चित्रात बैल दाखवण्याची वेळ येईल”, असं पडळकर म्हणाले.

दहा वर्षे नागपुरात राहणारा नूर मोहम्मद तालिबान्यांमध्ये सामिल झाल्याचा संशय
माझं मंत्रिपद जाणार म्हणून काही जणांना गुदगुल्या झाल्या तर काही खुशीत होते : रावसाहेब दानवे