सांगलीतील आटपाडीमध्ये झालेल्या हल्ल्या प्रकरणी गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

| Updated on: Dec 26, 2021 | 12:33 PM

भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी तो व्हिडीओ 7 नोव्हेंबर 2021 असल्याचा दावा केला आहे.

भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी तो व्हिडीओ 7 नोव्हेंबर 2021 असल्याचा दावा केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी या हल्ल्यात जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. कारवाईच्या नावाखाली माझ्या बॉडीगार्डला सस्पेंड केलं आणि माझ्यावर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

राज्यातील पहिल्या बैलगाडा शर्यतीला परवानगी, लांडेवाडीत होणार पहिली शर्यत
विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत महाविकास आघाडी सरकारचे नेते राज्यपालांची भेट घेणार