Mumbai मधील Azad Maidan मध्ये मंगळवारी ST कर्मचाऱ्यांसोबत Gopichand Padalkar बेठक घेणार
आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांसह जमत पडळकरांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. पुन्हा आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणं शक्य नाही, असं त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. कोर्टाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा हा अहवाल आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत पटलावर ठेवला.
मुंबई : कालच एसटीचे (St Worker Strike) विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल कोर्टात दिल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली होती. सुरूवातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे नेतृत्वात आमदार पडळकर यांनी केलं होतं, परबांच्या या माहितीनंतर आता गोपीचंद पडकर (Gopichand Padalkar) पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात उतरले आहेत. आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांसह जमत पडळकरांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. पुन्हा आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणं शक्य नाही, असं त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. कोर्टाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा हा अहवाल आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत पटलावर ठेवला. त्यामुळे मागील तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून संप करणाऱ्या हजारो एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसलाय.