सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरूच, तोडगा कसा निघणार? बघा Tv 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
VIDEO | जुनी पेन्शन लागू करा, यामागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, कुठे-कुठे झाला आंदोलनाचा परिणाम?
मुंबई : विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निवेदन सादर केले आणि मोठी घोषणा केली. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत समिती नेमण्यात येईल. या समितीला तीन महिन्याचा कालावधी देण्यात आला असून त्यानतर निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तर जुन्या पेन्शन संदर्भात नेमलेली समिती येत्या तीन महिन्यात अहवाल देईल, त्यामुळे संप मागे घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना केले आहे. आजपासून राज्यभरात बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या संघटनांनी बेमुदत संप पुकारला आहे. यासंपाचा कुठे आणि कोणता परिणाम झाला आहे, बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट…
Published on: Mar 15, 2023 12:00 AM