मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर, भगवी लाट कधीही येणार… अन् मुख्यमंत्री म्हणतात, सरकार अजूनही..

| Updated on: Jan 25, 2024 | 5:50 PM

मराठा आरक्षण सरकार देणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका काल आज आणि उद्याही तीच राहणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार अजूनही सकारात्मक आहे. सरकार मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मनस्थितीत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले

सातारा, २५ जानेवारी २०२४ : मराठा आरक्षण सरकार देणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका काल आज आणि उद्याही तीच राहणार आहे. ओबीसी आणि इतर कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सरकार आरक्षण देणार आहे, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला तर मागास वर्ग आयोग त्यासंदर्भात कामाला लागले आहे. १ लाख ४० हजार लोकांचं काम मराठा आरक्षणासंदर्भात तीन शिफ्टमध्ये सुरू आहे. तर कुणबी नोंदी जिथे सापडताय त्यांना कुणबी आरक्षण देण्याचे काम सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी विनंती करत एकनाथ शिंदे पुढे असेही म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात सरकार अजूनही सकारात्मक आहे. सरकार मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मनस्थितीत आहे. ओबीसी समाजाला ज्याप्रमाणे सुविधा आहे, त्याप्रमाणे मराठ्यांना देखील सुविधा देण्याचे काम सरकार करत असल्याचे शिंदेंनी म्हटले आहे.

Published on: Jan 25, 2024 05:50 PM
मनोज जरांगे पाटलांना शिवाजी पार्क अन् आझाद मैदानाची परवानगी नाकारली, मराठ्यांचं आंदोलन कुठं होणार?
मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, मराठा आरक्षणावर तोडगा निघण्याची शक्यता, बैठकीत नेमकं काय घडलं?